माणूस हा सामाजिक प्राणी आहे. खूप काळ एकांतवासात राहायला लागले, तर आपला मानसिक तोल ढासळू लागतो, हे अनेक शोधांद्वारे सिद्ध झालेले आहे. असे असतानाही अनेकांना इतरांशी संवाद साधणे कठीण जाते.
शासकीय नोकरीत आपले करिअर करू इच्छिणा-या युवावर्गासाठी बँक क्षेत्र हे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यंदाचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी प्रवर्गातील भरती प्रक्रियेचा कल लक्षात घेतल्यास- आय.बी.पी.एस., स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 2014-15 वर्षांत सुमारे 90 हजार अधिकारी व कर्मचारी पदे भरण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. या पर्वणीचा लाभ बारावी व पदवीधर विद्याथ्र्यांनी करून घ्यायला हवा. विविध इन्स्टिटयूटद्वारे घेतल्या जाणाया बँकिंग, क्लार्क, पी.ओ., स्केल-वन, स्केल-टू व स्केल-थ्री, ग्रुप- ए अधिकारीवर्गाच्या परीक्षा तसेच ग्रुप- बीच्या
परीक्षा, लिपिक पदाच्या परीक्षा, ग्रामीण क्षेत्रीय बँकांसाठी लागणार्या विविध पदांसाठी घेतल्या जाणार्या परीक्षांची माहिती देत आहोत - केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्यसेवा लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी भरल्या जाणा-या पदांची माहिती जाहिरातीद्वारा प्रसिद्ध केली जाते. त्यावर नजर टाकल्यास दरवर्षी केद्रीय पातळीवर ८०० ते हजार तर राज्यपातळीवर ३०० ते ५०० एवढी शासकीय पदे भरली जातात, हे लक्षात येते. मात्र त्यासाठी सुमारे अडीच ते तीन लाख विद्यार्थी अर्ज करीत असतात.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलोतरी बँक हि सापडणारच. आर्थिक क्षेत्रात बँकिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बदलत्या, खुल्या अर्थ-व्यवस्थेत, जागतिकीकरणाच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत बँकांचा तितकाच मौल्यवान सहभाग आहे. व्यापाराची..व्यवसायाची बदलती रूपं, देशा-देशांच्या सीमा पुसून आयात-निर्यातीला आलेला वेग, डॉलरपाठोपाठ युरोचे वाढते साम्राज्य, संगणक-इंटरनेटच्या माध्यमातून शीघ्र पेमेंट सिस्टिम, ई कॉमर्सच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलेलं ई-बँकिंग अशा सगळ्या घडामोडीत बँकिंग हे क्षेत्र व्यापक होते आहे
खासगी क्षेत्रातल्या नोक-या कितीही वाढल्या असल्या आणि त्यातील भल्यामोठ्या पगाराचे आकडे चमकत असले तरी बँकेतल्या नोक-यांचं महत्त्व कमी झालेलं नाही. आजही बँकेच्या नोकरीविषयी आपल्या मध्ये आकर्षण कायम आहे. |
Suresh Dindorkar
Author and Admin of this site was formerly P.S. to Union Minister, Govt of India , New Delhi Archives
September 2015
Categories
All
|